फक्त 2,500 रुपये भरून घराला मोफत वीज! केंद्र–राज्याची मोठी घोषणा, सामान्य जनतेला जबरदस्त दिलासा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rooftop Solar Yojana Maharashtra | महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता वाढत्या वीज बिलामुळे अक्षरशः हैराण झाली आहे. विजेचा वापर वाढतोय, दर वाढतायत आणि महिन्याच्या शेवटी हातात पगार येण्याआधीच वीजबिलाचं टेन्शन डोकं वर काढतंय. अनेक घरांत तर बिल दुप्पट-तिप्पट येत असल्याने सामान्य माणसाचं बजेट कोलमडलंय.

याच वाढत्या ओझ्याला आळा घालण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने एकदम महत्त्वाची घोषणा केली आहे. आजची बातमी विशेषतः त्यांच्यासाठी, जे वीजबिलामुळे त्रासलेले आहेत आणि यावर काहीतरी कायमस्वरूपी उपाय शोधत आहेत.

खरंतर, स्वच्छ ऊर्जा प्रोत्साहन आणि घरगुती वीजबिलात मोठी कपात करण्यासाठी PM सूर्यघर मोफत वीज योजना आणि राज्याची i-SMART रूफटॉप सोलर योजना 2025 जोरात राबवली जात आहे.

या दोनही योजनांचं एकत्रीकरण झाल्यानं आता ग्राहकांना केवळ 2,500 रुपये नाममात्र रक्कम भरून घराच्या छतावर सोलर सिस्टम बसवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. उर्वरित संपूर्ण खर्च केंद्र + राज्य अनुदानातून कव्हर केला जाणार आहे. म्हणजे जवळपास मोफतच सोलर!

कुणाला मिळणार 95% पर्यंत अनुदान?

ही योजना खास करून महाराष्ट्रातील सामान्य वीज ग्राहक लक्षात घेऊन सुरू करण्यात आली आहे.

➡️ १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणारे ग्राहक

➡️ दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबे

➡️ कमी वीज वापर करणारे घरगुती ग्राहक

  • या लाभार्थ्यांना ९५% पर्यंत अनुदान, तर काहींना ९०% मिळणार आहे.
  • ओपन आणि ओबीसी कॅटेगिरीतील ग्राहकांनाही ८०% अनुदान देण्यात येणार आहे.
  • म्हणजे अवघ्या ₹2,500 भरून सोलर सिस्टम बसवण्याची मोठी संधी… सामान्य माणसासाठी अक्षरशः वरदानच.
  • एकत्र पोर्टल – एकच अर्ज
  • आता दोन वेगवेगळ्या पोर्टलची चिंता नाही.
  • PM सूर्यघर आणि i-SMART पोर्टल एकत्र करण्यात आले आहे.
  • एकाच ठिकाणी केलेला अर्ज दोन्हीकडे स्वीकारला जाईल. त्यामुळे प्रक्रिया अजूनच सोपी झाली आहे.

महाडिस्कॉम पोर्टलवर अर्ज कसा कराल?

संपूर्ण प्रक्रिया साधी आणि सोपी

1. सर्वप्रथम महाडिस्कॉमच्या वेबसाईटला भेट द्या

2. तिथे ‘Apply for Rooftop Solar’ या लिंकवर क्लिक करा

3. तुमचा वीज ग्राहक क्रमांक टाका

4. मोबाईल OTP ने पडताळणी करा

5. स्क्रीनवर तुमचं नाव, पत्ता, बिलिंग युनिट आपोआप दिसेल

6. त्यानंतर आधार + PAN तपशील अपडेट करा

7. आधार OTP पडताळणी पूर्ण करा

 तुमचा अर्ज सबमिट होईल.

आज वाढती महागाई, वाढतं वीजबिल आणि घरगुती खर्च यामध्ये सर्वसामान्य माणूस अक्षरशः कोंडला आहे. अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेला हा दिलासा अनेक कुटुंबांच्या खिशाला मोठा आधार देणार आहे.

कधी काळी स्वप्न वाटणारी ‘घरची मोफत वीज’ आता प्रत्यक्षात उतरतेय… आणि तेही फक्त ₹2,500 मध्ये!

ही संधी हातातून जाऊ देणं म्हणजे खरंच मोठी चूक ठरेल.

Leave a Comment