३० जूनपूर्वी मोठी घोषणा? कर्जमाफीचा संकेत मिळताच शेतकरांची धावपळ सुरू पहा यादी!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Karj maafi 2025  | यंदाच्या अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून कर्जदार सभासदांची नव्याने माहिती संकलित करण्याचे निर्देश मिळताच सोसायट्यांनी मोठी मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे “नवी कर्जमाफी” राबविली जाणार का? अशी चर्चा भागात जोर धरत आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत आलेल्या स्पष्ट आदेशांनुसार प्रत्येक कर्जदार सदस्यांची तपशीलवार माहिती तातडीने सादर करण्यास सांगण्यात आली आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादीही जाहीर झाली असून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड हालचाल सुरू आहे.

सोसायट्यांकडून मागण्यात आलेली कागदपत्रे 

• 7/12 उताऱ्याची छायांकित प्रत

• आधार कार्ड प्रत

• फॉर्मर आयडी

• पॅन कार्ड प्रत

• सेव्हिंग किंवा जॉइंट खात्याची पासबुक प्रत

• कर्जखात्याची सीसीसी प्रत

• मोबाईल क्रमांक लिंक असल्याचा पुरावा

काही कर्जदारांकडे मूळ कागदपत्रे नसल्यास वर्साय किंवा नोटरीकृत प्रत तातडीने देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व कर्जदारांनी ही कागदपत्रे पुढील पाच ते सहा दिवसांत सोसायटीकडे जमा करावी, असा स्पष्ट इशाराही देण्यात आलाय.

दरम्यान, ग्रामीण भागात या नोटीसनंतर शेतकऱ्यांची सोसायट्यांकडे मोठी गर्दी दिसत आहे. अनेकांच्या चेहऱ्यावर आशेची किरणं दिसत असली तरी अद्याप शासनाकडून अधिकृत घोषणा आलेली नाही. मात्र मागील काही दिवसांपासून कर्जमाफीसंबंधी हालचाली सुरू असल्याच्या चर्चेमुळे शेतकरी अधिकच उत्सुक झाले आहेत.

“३० जूनपूर्वी कर्जमाफी” असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यामुळेच या नवीन हालचालींना आणखी वेग आला असून शेतकऱ्यांचा विश्वासही वाढला आहे.

सोसायटीकडून स्पष्ट सूचना 

जे सभासद कागदपत्रे वेळेत जमा करणार नाहीत, त्यांची जबाबदारी त्यांच्यावरच राहील. तसेच ज्यांचे बचत खाते किंवा कर्ज खाते नाही, त्यांनी तातडीने नवीन खाते उघडावे लागणार आहे.

शेवटचा मुद्दा  आशा शेतकऱ्यांच्या नजरेत!

दरवर्षीच्या संकटांना कंटाळलेला शेतकरी आज पुन्हा एकदा कर्जमाफीच्या आशेने सोसायटीच्या दारात उभा आहे. या माहिती संकलनामुळे कर्जमाफीचा मार्ग खरोखर मोकळा होणार का? की ही फक्त आणखी एक प्रक्रिया? अद्याप स्पष्ट नाही. पण शेतकऱ्यांच्या डोळ्यात आशेचा एक छोटासा दिवा पुन्हा पेटला आहे… आणि त्या दिव्याचं काय होणार, हे पुढच्याच काही दिवसांत कळेल.

Leave a Comment