Onion Market Price : महाराष्ट्रात आज 22 नोव्हेंबरचा कांदा बाजारभाव पाहायला गेला तर प्रत्येक बाजार समितीत वेगवेगळा चित्र दिसलं. काही ठिकाणी दर जरा बऱ्यापैकी मिळाले तर काही ठिकाणी शेतकरी अजूनही भाव पाहून नाराजच दिसले. सकाळपासून बाजारात ज्या गाड्या येत होत्या त्यात बहुतेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न“आज भाव काय मिळतोय?” कारण गेली अनेक महिने कांद्याचा भाव वरखाली होत असल्यामुळे शेतकऱ्याचं गणित पूर्णच विस्कटलं आहे. काही ठिकाणी उन्हाळी कांद्याला बऱ्यापैकी दर मिळाले, तर काही ठिकाणी 200–300 च्याही खाली बोली लागल्याचं दिसलं. या सगळ्या घडामोडींमध्ये आज कोणत्या बाजार समितीत किती दर मिळाले? कुठे शेतकऱ्यांचा चेहरा खुलला आणि कुठे अजूनही चिंता कायम राहिलीयाची मोठी अपडेट पुढे दिली आहे.
कोल्हापुरात आज आवक 5,794 क्विंटल इतकी झाली आणि तिथे कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 2,000 दर मिळाले. हा रेंज पाहिला तर शेतकऱ्यांनी मध्यम समाधान व्यक्त केलं, पण सर्वसाधारण दर 1,000 रुपये एवढाच राहिला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ही आवक 2,392 क्विंटल राहिली आणि तिथे मात्र कमीत कमी 270 पासूनच बोली सुरू झाली. जास्तीत जास्त 1,100 मिळाले, तरी सरासरी 685 रुपये इतका दर शेतकऱ्यांना फारसा भावला नाही. चंद्रपूर–गंजवड मात्र आज दमदार राहीला. फक्त 380 क्विंटल आवक असूनही तिथे 1,300 ते 2,000 असा उत्तम दर मिळाला आणि शेतकऱ्यांनी हलका दिलासा घेतला.
कराडमध्ये आज हालवा कांद्यासाठी 500 ते 1,300 असा दर मिळाला तर सोलापूरमध्ये लाल कांद्याची मोठी आवक 18,210 क्विंटल झाली. इथे किमान दर 100 रुपये लागला हा भाव पाहून अनेक शेतकरी निराश झाले, पण काहींना 2,500 च्या आसपास चांगला दरही मिळाला. पांढरा कांदा मात्र सोलापुरात 1,100 ते 2,400 च्या रेंजमध्ये विकला गेला. नागपूरमध्ये पांढऱ्या कांद्याला आज 1,600 ते 2,000 असा मजबूत दर मिळाला आणि तिथे व्यापाऱ्यांचीही चांगली खरेदी दिसली.
नाशिकच्या भागात, लासलगाव, विंचूर, येवला, चांदवड, मनमाड, पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांद्याचे दर मिश्र राहिले. लासलगावमध्ये 401 ते 1,620 असा रेंज, पिंपळगाव बसवंतमध्ये तर 400 ते 2,200 असा चांगला दर काहींना मिळाला. येवला आणि चांदवडमध्ये मात्र सरासरी 800–930 च्या आसपासच भाव दिसला. मनमाडमध्ये सरासरी दर 1,100 इतका मिळाल्यामुळे काही शेतकरी समाधानाने घरी गेले. भुसावळमध्ये आज फक्त 2 क्विंटल आवक असूनही थेट 1,500 चा दर मिळाला.
आजचा एकूण निष्कर्ष असा की महाराष्ट्रातील कांदा बाजार अजूनही अस्थिर आहे काही बाजारात दर वर जात आहेत तर काही ठिकाणी अजूनही घसरण दिसतेय. शेतकऱ्यांनी दररोज बाजाराचा कल पाहणं अगदी आवश्यक झालं आहे. पुढील काही दिवसांत आवक-निर्गमन, हवामान आणि स्टॉकनुसार भावात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.