आता आधार कार्डवर मिळणार १०,००० रुपयांचं वैयक्तिक कर्ज! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar card loan apply online | कधी कधी अशी परिस्थिती येते की पैशांची गरज लागते आणि जवळ काहीच नसतं. आजारी माणूस असो, मुलीचं लग्न असो, शेतीचं काम असो, की एखादा छोटा व्यवसाय सुरु करायचा असो  काही ना काही कारणाने आपल्याला पैशांची आवश्यकता भासतेच. अशावेळी लोक बँकांचे दरवाजे झडतात. पण बँकाही लगेच कुणाला कर्ज देत नाही. त्यांचे नियम, अटी, वेळखाऊ प्रक्रिय  यामध्येच सामान्य माणूस हरवतो.

मात्र आता चिंता करण्याचं कारण नाही. कारण, तुमचं फक्त आधार कार्ड असलं तरी तुम्ही वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता. होय, अगदी १०,००० रुपयांपासून सुरुवात करून हप्त्याने परत करता येईल असं सहज कर्ज मिळू शकतं.

कर्ज घेण्यासाठी काय पात्रता लागते?

जर तुम्हाला आधार कार्डद्वारे कर्ज मिळवायचं असेल, तर तुमचं वय २१ ते ६० वर्षांदरम्यान असणं आवश्यक आहे. काही कर्ज देणाऱ्या कंपन्यांच्या अटी वेगळ्या असू शकतात, त्यामुळे आधी एकदा त्यांची पात्रता नीट तपासून पाहणं गरजेचं आहे.

उत्पन्न आणि व्यवसाय महत्त्वाचा

कर्ज मिळवण्यासाठी तुमचं काहीतरी नियमित उत्पन्न असणं गरजेचं आहे. तुम्ही पगारदार असाल, एखाद्या कंपनीत काम करत असाल किंवा स्वतःचा व्यवसाय करत असाल, तरी कर्जासाठी अर्ज करू शकता. पण उत्पन्नानुसारच तुमचा व्याजदर ठरतो, हे लक्षात ठेवा.

क्रेडिट स्कोअर आणि बँक स्टेटमेंट 

काही बँका किंवा कर्ज संस्था तुमचं पूर्वीचं कर्जाचं वर्तन (क्रेडिट स्कोअर) तपासतात. तुम्ही वेळेवर कर्ज परत केलं आहे की नाही, ही गोष्ट महत्त्वाची असते. पण काही कंपन्या अशांनाही कर्ज देतात ज्यांचा क्रेडिट इतिहास कमी असतो.

बँक खातं आणि आधार लिंक असणं आवश्यक

तुमचं बँक अकाउंट सक्रिय असणं आणि ते आधार कार्डशी लिंक असणं अत्यावश्यक आहे. कारण कर्जाची रक्कम थेट या खात्यावरच पाठवली जाते.

आधार कार्डवर कर्जासाठी अर्ज कसा कराल?

1. सर्वात आधी ज्या बँकेकडे किंवा कर्ज संस्थेकडे अर्ज करायचा आहे, त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

2. तिथे Loan Eligibility तपासा.

3. व्याजदर, परतफेडीच्या अटी, शुल्क याची माहिती नीट वाचा.

4.  आवश्यक कागदपत्रे 

आधार कार्ड

पॅन कार्ड

उत्पन्नाचा पुरावा

बँक पासबुक

5. मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे की नाही, हे तपासा.

6. आता KYC प्रक्रिया पूर्ण करा.

7. ऑनलाइन फॉर्म भरून अर्ज सबमिट करा.

8. काही कंपन्या २४ ते ४८ तासांत कर्ज तुमच्या खात्यात जमा करतात.

 ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला बँकेकडून तुमच्या अधिकृत मोबाईल क्रमांक वरती एसएमएस प्राप्त होईल. त्यामध्ये तुमचं लोन अप्रोल झाले चा मेसेज येईल यानंतर तुमच्या अकाउंट वरती पैसे जमा होणार आहे. तुम्ही लोन घेतल्यानंतर या लोणचे हप्ते नियमित परतफेड करायची आहे जर तुम्ही परतफेड वेळेवर केली नाही तर तुमचा सिव्हिल स्कोर खराब होऊ शकतो. 

Leave a Comment