महाराष्ट्रात आजपासून मोठा हवामान बदल! दक्षिण कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पाऊस, उत्तर महाराष्ट्रातील थंडीला ब्रेक

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD Weather Alert | सध्या राज्यभरात गुलाबी थंडीचा जोर वाढलाय. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात तर हाडे गोठवणारी थंडी नागरिकांना अक्षरशः अंगावर काटा आणतेय. सकाळ-संध्याकाळ रस्त्यावर पडणारा दंव आणि वाहणारी थंड हवा  पूर्ण उत्तर महाराष्ट्र अंग गोठवून टाकतेय.

त्यातच काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरणामुळे थंडीची तीव्रता काल थोडीशी कमी झाली, पण तरीही कमाल आणि किमान तापमान दोन्ही खालीच आहे. मात्र आजपासून राज्याच्या हवामानात मोठा बदल दिसणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवलाय.

दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची सुरुवात

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात आजपासून वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील २ ते ३ दिवस म्हणजेच २२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत पावसाचा फेर सुरू राहणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गसोबत सातारा, सांगली, कोल्हापूर या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस दिसू शकतो.

मुंबईत काय बदल?

मुंबई शहर आणि उपनगरात आज वातावरण कोरडंच राहणार असून,

कमाल तापमान – 33°C

किमान तापमान – 21°C

असा अंदाज आहे.

पुणे-सोलापूरात काय स्थिती?

पुणे आणि सोलापूर हे दोनही जिल्हे आज पूर्णपणे कोरडेच राहतील, अशा संकेत वेधशाळेकडून मिळत आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील कडाक्याच्या थंडीत घट

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिकसारख्या भागात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडतेय. पण दक्षिणेकडील भागात सुरू होणाऱ्या पावसामुळे उत्तर महाराष्ट्रातील थंडीची तीव्रता आजपासून कमी होऊ शकते.

मराठवाडा आणि विदर्भातसुद्धा थंडी काहीशी मवाळ होणार आहे. विदर्भातील काही भागात ढगाळ वातावरण राहील, पण पावसाची शक्यता नाही. येथील हवामान प्रामुख्याने कोरडेच राहणार.

शेवटचा मुद्दा  हिवाळ्यातला पाऊस म्हणजे संकेत!

हिवाळ्यात मॉन्सूनसदृश पाऊस पडणे हे शेतकरी, रबी पिकं आणि ग्रामीण भागासाठी मोठा बदल ठरतो. तापमानात उडालेली ही अचानक उलथापालथ पुढील हवामानावरही परिणाम करणार. थंडी आणि पाऊस यांचा एकत्रित मार काही जिल्ह्यांमध्ये जाणवू शकतो.

1 thought on “महाराष्ट्रात आजपासून मोठा हवामान बदल! दक्षिण कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पाऊस, उत्तर महाराष्ट्रातील थंडीला ब्रेक”

Leave a Comment