Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात लाडकी बहिण योजनेचा हप्ता महिलांसाठी किती महत्त्वाचा आहे हे सांगायला नको. घरातील किराणा, मुलांचे खर्च, औषधांचा खर्चसगळ्या गोष्टींसाठी या १५०० रुपयांचा मोठा आधार मिळतो. पण नोव्हेंबर महिना संपायला एवढा जवळ आला तरीही हप्त्याबाबत काहीच हालचाल दिसत नसल्याने गावोगाव, शहरोपशहर महिलांत प्रचंड चर्चा सुरू आहे. “यंदा काय झालं, हप्ता का येत नाही?” “कधी येईल?” “सगळे राजकारणच तर…” अशा प्रश्नांनी आज हजारो महिलांच्या मनात गोंधळ आहे. त्यातच निवडणुकीचे वारे वाहत असल्याने अजूनच संभ्रम वाढला आहे.
लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आता सगळ्यांच्या नजरा सरकारकडे लागलेल्या असताना मोठी खबर अशी की नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता जोरात बोलली जात आहे. म्हणजेच एकाच वेळी ३००० रुपये खात्यात जमा होऊ शकतात असा अंदाज व्यक्त होत आहे. पण हे फक्त बोलले जात असले तरी अधिकृत घोषणा अजूनपर्यंत झालेली नाही. त्यामुळे अनेक बहिणींच्या मनात अजून अनिश्चितता आहे.
२ आणि ३ डिसेंबरला नगरपरिषदेच्या निवडणुका आहेत. याच पार्श्वभूमीवर काहींचं म्हणणं आहे की निवडणुकीपूर्वी पैसे येतील, तर काहींचा अंदाज नेमका उलट—निवडणुका झाल्यावर हप्ता एकत्र येऊ शकतो. कारण प्रशासनही सध्या निवडणूक प्रक्रियेत अडकलेलं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी महिलांनी बँकेत जाऊन चौकशी केली तर “अजून लिस्ट आलेली नाही”, “वरून आदेश नाही”, “सिस्टम अपडेट नाही अशीच उत्तरं मिळत आहेत.
दरम्यान, या सगळ्या चर्चेत एक महत्त्वाची बाब पुढे आली आहे KYC. लाडकी बहिण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी ज्यांनी केवायसी केलेली नाही, त्यांचे पैसे थांबू शकतात. सरकारने केवायसीची मुदत वाढवून ३१ डिसेंबरपर्यंत केली आहे. एक कोटीहून अधिक महिलांची केवायसी राहिलेली असल्याचे सांगितले जाते. त्यात अशा महिलांचाही समावेश आहे की ज्यांच्या पतींचे किंवा वडिलांचे निधन झाले आहे. त्यांच्या कागदपत्रांची प्रक्रिया थोडी गुंतागुंतीची असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रोसेस सुरू आहे.
यामुळे हप्ता येण्यास उशीर होण्याची शक्यता आणखी वाढली आहे. म्हणूनच अनेक अधिकारी सांगत आहेत की लिस्ट तयार होईपर्यंत आणि केवायसी अपडेट होईपर्यंत वेळ जाणे साहजिक आहे. पण महिलांची मात्र एकच अपेक्षा“हप्ता कधी येणार ते सांगा, बाकी आम्ही पाहू…”
एकूणच पाहता, नोव्हेंबर-डिसेंबरचे ३००० रुपये एकत्र मिळू शकतात, पण याबाबत अधिकृत घोषणा अद्याप नाही. पुढील काही दिवसांत सरकारकडून मोठं अपडेट येण्याची शक्यता नक्कीच आहे. सध्या मात्र प्रत्येक लाडकी बहिणीने आपल्या केवायसीकडे लक्ष देणं आणि खातं सक्रिय ठेवणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे.
हे पण वाचा | ‘लाडकी बहीण’ योजनेची केवायसी प्रक्रिया बदलली; महिलांनी कशी करायची KYC? जाणून घ्या सविस्तर