लाडकी बहिण योजनेवर मोठी घोषणा! केवायसीमध्ये दिलासा  लाखो महिलांची चिंता संपली, जाणून घ्या संपूर्ण निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana KYC | लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून आज एक मोठा आणि दिलासा देणारा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून केवायसीच्या अडचणीमुळे अनेक महिलांचे अर्ज अडकून पडले होते. विशेष म्हणजे ज्या महिला पती किंवा वडील दोघांनाही गमावून बसल्या आहेत, त्यांची अवस्था तर अधिकच बिकट झाली होती. त्यांच्या अर्जांची प्रक्रिया थांबलेली, घरात त्या पैशाची पण गरज आणि त्यात सरकारी चकरा  अशी परिस्थिती निर्माण झाली होती. Ladki Bahin Yojana KYC

या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारने अखेर महत्वाचा पाऊल उचलत केवायसीची अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता लाभार्थ्यांना त्यांची अद्ययावत कागदपत्रं सादर करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे. ग्रामीण भागातील इंटरनेट समस्या, कागदपत्रांची अपूर्णता आणि पोर्टलवरील तांत्रिक अडचणी यामुळे ज्या बहिणींची केवायसी राहिली होती, त्यांना ही मुदतवाढ म्हणजे मोठा दिलासा ठरणार आहे.

योजनेनुसार लाभ मिळवण्यासाठी पती किंवा वडील यांची केवायसी अनिवार्य करण्यात आली होती. पण पती हयात नाही आणि वडीलही नाहीत अशा महिलांसाठी ही अट मोठा आडसर ठरत होती. त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने आता अशा बहिणींसाठी नवीन पर्यायी केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे. प्रशासनाने स्पष्ट सांगितलंय की ज्या महिलांच्या नावे दोघेही नाहीत, त्यांचे अर्ज अडथळ्याविना नोंदवले जातील आणि त्यांना मिळणारे लाभ रोखले जाणार नाहीत.

हा निर्णय म्हणजे लाखो महिलांच्या आयुष्यात आशेचा नवा किरणच. आर्थिक परिस्थितीत थोडाफार गारवा देणारी लाडकी बहीण योजना त्यांच्या हातातली खरी मदत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता कोणाचंही हक्काचं लाभ फक्त कागदपत्रांच्या कमतरतेमुळे अडकू नये, ही काळजी घेतली गेल्याचं दिसतं.

शासनाचे आदेश बाहेर पडताच जिल्हा प्रशासनाने सर्व केंद्रांना मार्गदर्शन देण्यास सुरुवात केली आहे. ग्रामपंचायत, महावितरण केंद्रे आणि केवायसी करणारी खासगी कॉमन सर्व्हिस सेंटर्स यांना देखील स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की अशा महिलांची केवायसी अडवायची नाही.

महिन्याच्या शेवटी घरात लागणारा खर्च, मुलांच्या शाळा, दिवाळीनंतर वाढलेलं मार्केटचं चढणं  अशा वेळी लाखो कुटुंबांना हा निर्णय निश्चितच दिलासा देऊन जाणारा आहे. शासनाचे आदेश प्रत्यक्षात पोहोचले आणि प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली, तर अनेकांच्या आयुष्यात ही योजना आजही तितकीच महत्त्वाची ठरेल.

आता उरलेलं एकच  कागदपत्रं वेळेत तयार ठेवणं आणि ३१ डिसेंबरपूर्वी केवायसी पूर्ण करून घेणं. कारण कोणताही लाभ अधुरा राहू नये, प्रत्येक बहिणीपर्यंत योजना पोहोचावी, हेच खरं उद्दिष्ट आहे.

1 thought on “लाडकी बहिण योजनेवर मोठी घोषणा! केवायसीमध्ये दिलासा  लाखो महिलांची चिंता संपली, जाणून घ्या संपूर्ण निर्णय”

Leave a Comment