राज्य सरकार देणार शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी तब्बल ५०% अनुदान!  अर्ज सुरू, सविस्तर माहिती जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahadbt Tractor Subsidy :- शेतकऱ्यांनो, आता ट्रॅक्टर खरेदी करायची तुमची स्वप्नं होणार पूर्ण! कारण राज्य सरकारनं २०२५-२६ या वर्षासाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी थेट ४०० कोटींची मोठी तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला ट्रॅक्टर खरेदीसाठी ५० टक्क्यांपर्यंतचं अनुदान मिळणार आहे.Mahadbt Tractor Subsidy

कोणाला मिळणार फायदा?

या योजनेत अनुसूचित जाती-जमातीतील शेतकरी, सामान्य महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५० टक्के किंवा ₹1.25 लाखांपर्यंत (जे कमी असेल तेवढं) अनुदान दिलं जाणार आहे. इतर शेतकऱ्यांना ४० टक्के किंवा ₹1 लाखांपर्यंत (जे कमी असेल तेवढं) अनुदान दिलं जाईल.

कस होणार अर्ज?

संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे आणि महाडीबीटी पोर्टलद्वारे केली जाणार आहे. अर्ज करणाऱ्यांचे सर्व कागदपत्र योग्य असतील, तर अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे कोणत्याही दलालाचा लपाटा नको!

शेती यांत्रिकीकरण का गरजेचं?

आजच्या घडीला बैलजोड्या टिकवणं कठीण झालंय. त्यामुळे ट्रॅक्टर, यंत्र, अवजारं ह्यांची गरज वाढलीय. यांत्रिकीकरणामुळे:

वेळेवर शेतीची कामं पूर्ण होतात

खत, बी, मजूर यांचा खर्च कमी होतो

उत्पादन वाढतं

मजूर टंचाईचा प्रश्न सुटतो

शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन सरकार पुढं सरसावलंय.

या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेणं शक्य होणार आहे. उत्पादन वाढल्यामुळे उत्पन्नही वाढेल आणि शेती फायदेशीर ठरेल.

काय करायचं आहे पुढं?

mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्या

अर्ज करताना आवश्यक कागदपत्रं तयार ठेवा – आधार कार्ड, सातबारा, बँक पासबुक, जात प्रमाणपत्र, भूधारक प्रमाणपत्र

अर्ज वेळेत भरा आणि अर्जाची स्थिती तपासत राहा

अशाच अनेक  नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment