तुमचा लाडकी बहीण लाभ आता बंद! कोणत्या महिलांचे लाभ थांबणार? यादी पाहा 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Ladki Bahin Yojana | महाराष्ट्रातील लाखो महिलांना दरमहा आर्थिक आधार देणाऱ्या लाडकी बहीण योजनेत आता सर्वात मोठा बदल समोर आला आहे. शासनाने ई-केवायसी अनिवार्य केल्यानंतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत. ज्या महिलांनी अद्याप केवायसी केलेली नाही, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही हे जवळपास निश्चित आहे.

मात्र, याहूनही मोठी गोष्ट म्हणजे ई-केवायसीतून महिलांचे अचूक वार्षिक उत्पन्न समोर येणार असून २.५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचे अर्ज थेट बाद होणार आहेत.

ई-केवायसीमधून उघड होणार सर्व तपशील

लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना केवळ महिलांचीच नाही तर त्यांच्या पती किंवा वडिलांचीही केवायसी केली जाणार आहे. म्हणजेच कुटुंबाचे एकूण उत्पन्न, वय, कुटुंबातील कागदपत्रांमधील माहिती  सर्व काही शासनाच्या नजरेसमोर येणार आहे.

याच माहितीच्या आधारे शासन अंतिम निर्णय घेणार असून अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न दिसल्यास त्या लाभार्थी महिलांना योजना बंद होणार आहे.

३१ डिसेंबर अंतिम तारीख  न केल्यास लाभ बंद

शासनाने स्पष्ट केलं आहे की ई-केवायसीसाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंतच आहे.ही अंतिम तारीख चुकली तर लाखो महिला लाभापासून दूर राहतील.

५२ लाख महिलांना आधीच अपात्र ठरवले गेले

लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर जवळपास अडीच कोटी महिलांनी लाभ घेतला. मात्र, पडताळणीत मोठा धक्का बसला

५२ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं कारण त्या निकषांमध्ये बसत नव्हत्या. आता ई-केवायसीनंतर आणखी काही महिलांचे लाभ बंद होण्याची शक्यता आहे.

प्राप्तिकर विभागाकडे जाणार माहिती

ही आहे सर्वात मोठी गोष्ट ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर महिलांची संपूर्ण माहिती प्राप्तिकर विभागाकडे दिली जाणार आहे. तेथून पडताळणी करून ज्या महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांचा लाभ कायमचा बंद होणार आहे.

शेवटचं महत्त्वाचं सांगायचं तर 

ही योजना लाखो बहिणींसाठी आशेचा किरण होती आणि आजही आहे. पण शासनाने निकष कठोर केल्यामुळे केवायसी करणं अत्यंत गरजेचं झालं आहे. जे पात्र आहेत, त्यांना काहीच अडचण नाही.

मात्र, ज्या निकषांबाहेर आहेत त्यांचे लाभ गमावले जाणार हे स्पष्ट आहे. ३१ डिसेंबर ही अंतिम तारीख उशीर केला तर लाभ बंद – एवढं लक्षात ठेवा!

Leave a Comment